Tuesday, August 24, 2010

मना सज्जना - 001

लहानपणा पासून माणसाच्या सवयी बद्दल आपण अनेक म्हणी ऐकल्या जशा "जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही", "सुंभ जळाला तरी पीळ जात नाही", "कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच", "साखरेत घोळले तुपात तळले तरी कारले कडूच", "कावळा काळा व बगळा पांढरा". थोडक्यात या म्हणीचा अर्थ कि माणसाचा स्वभाव कधीच बदलत नाही. याच तत्वानुसार समाज त्या माणसाचे मूल्यमापन करतो व या माणसाचा स्वभाव कधीच बदलणार नाही असे म्हणतो. पण मग या म्हणींच काय? "प्रयत्नांती परमेश्वर", "प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे", "इच्छा असेल तर मार्ग दिसेल", म्हणजे समाज हे ही मानतो कि प्रयत्नपूर्वक कोणतीही गोष्ट शक्य आहे. मग माणसाच्या सवयी बद्दल असलेल्या म्हणी या चुकीच्या ठरतात. म्हणजे एखाद्याने प्रयत्न केल्यास त्याच्या सवयी व स्वभाव बदलता येतात. मी अनेक व्यक्तिमत्व विकासाच्या अभ्यास क्रमात भाग घेतला पथिक सारख्या प्रशिक्षण कार्यक्रमात गौरव पुरस्कार देखील मिळवला. न्युरो लिन्गुइस्टिक प्रोग्रम्मिंगचा, अल्ट्रा माइण्डचा अभ्यास केला. हे सर्व अभ्यासक्रम करताना माझ्या बरोबर अनेकजण होते. हा अभ्यासक्रम सुरु असताना सर्व सहभागी सकारात्मक विचारांनी व उर्जेने ओतप्रोत भरलेले असायचे, हा प्रशिक्षण कार्यक्रम संपल्यानंतर व्यवहारात हि सर्व तत्व वापरून यशस्वी होणारच असा प्रत्येकाचा विश्वास होता. पण या पैकी किती जण खरच यशस्वी झाले? बऱ्याचदा असे दिसून येते कि प्रशिक्षण कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण जवळ जवळ एक महिन्यापर्यंत भारलेले असतात. नंतर पुन्हा हरिदासाची कथा मूळ पदावर येते व हे सर्व जण पुन्हा इतर सामान्यजनाप्रमाणे जगायला लागतात. असे काय होते कि प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये शूर असलेले वीर प्रत्यक्षात हार मानतात. अनेक वर्ष शेक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात काम केल्यानंतर अनेक प्रकारचे विद्यार्थी व व्यक्ती भेटल्या. त्यांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. या विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले त्यांची उत्तरे देताना मलाही आयुष्य जगण्याची काही तत्वे सापडली. खर तर आजच्या विद्यार्थ्यांकडून बरेच तसेच आधुनिक ज्ञान मिळते. हि माहिती सर्वाना उपलब्ध व्हावी असे वाटले म्हणून हा ब्लॉग लिहिण्याचा अट्टाहास.
व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमात मनाच्या वाढीकडे विशेष लक्ष दिले जात नाही. व्यक्तीचा मूळ स्वभाव बदलला जात नाही. या संदर्भात एका झेन कथेची आठवण होते. एकदा जपानमधील एका विद्यापीठाचे प्राध्यापक झेन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी नान इन नावाच्या प्रसिद्ध झेन गुरुंकडे गेले. त्या प्राध्यापकांनी आपल्या शैक्षणिक ज्ञानाबद्दल गुरूंना माहिती दिली. आपल्या ज्ञानाच्या व्याप्तीची कल्पना दिली. परंतु झेन पद्धतीबद्दल काही माहित नसल्याचे सांगितले. गुरूंनी शांतपणे प्राध्यापकाचे बोलणे ऐकले व त्यांना चहा पिण्याची विनंती केली. स्वतः गुरु कपमध्ये चहा ओतू लागले. प्राध्यापकांचा कप पूर्ण भरला तरी गुरु चहा ओतत होते. चहा खाली सांडू लागला. आता प्राध्यापकांनी गुरूंना जाणीव करून देत म्हटले "कप पूर्ण भरला आहे त्यात अजून चहा राहू शकत नाही". यावर गुरूंनी उत्तर दिले "या कपाप्रमाणे तुमचे मन हे तुमची स्वतःची मते व विचार यांनी भरले आहे. जो पर्यंत तुम्ही तुमच्या मनाचा कप रिकामा करत नाही तोपर्यंत तुमच्या मनात नवीन ज्ञान (झेन) जाणार नाही. तुम्ही फक्त ज्ञान मिळवलं त्याचा व्यवहारात उपयोग होणार नाही कारण ते या चहा प्रमाणे वाहूनच जाणार.
कोणत्याही व्यक्तिमत्व विकास अथवा अध्यात्मिक विकास प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रवेश घेण्यापूर्वी आपल्या मनाचा कप आपल्याला अगोदर रिकामा करायचा आहे.

2 comments:

  1. we can change our nature bt according 2 jotisra each rashi have its own nature, is it true?

    ReplyDelete