Thursday, August 26, 2010

आपले जीवन नशिबावर अवलंबून असते का?

या अगोदरच्या ब्लॉग मध्ये अन्न साखळी या घटकात येणाऱ्या संकटांची चिंता न करण्याचा मी सल्ला दिला होता. तसेच जे होऊन गेले त्याचा विचार करू नये असे सांगितले होते. आता जीवन नशिबावर अवलंबून असते का? हा प्रश्न. या साठी आपण एक कथा पाहूया.
आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे बालकाच्या जन्मापासून सहाव्या दिवशी सटवी नावाची देवी येते व त्या बालकाचे भविष्य लिहिते. लोकसंख्या वाढल्या कारणाने या देवीचे काम खूपच वाढले. शेवटी एकदा ती कंटाळून ब्रह्मदेव (Generator) , विष्णू (Organiser) व शंकर (Destroyer) या त्रिदेवांकडे गेली व आपल्या होणाऱ्या त्रासाबद्दल व धावपळीबद्दल सांगितले. या वर त्रिदेवांनि तिला सांगितले कि त्या बालकाची फक्त जन्म वेळ व मृत्यू वेळ लिही मधले आयुष्य कसे जगायचे, कोणते अनुभव घ्यायचे, हे ते बालक स्वतः ठरवेल. म्हणून आताच्या काळात आपण आपले भविष्य ठरवू शकतो.
जे तुमच्या आयुष्यात झाले ते १०० % घडणारच होते. पुरावा हवा? पहा ते तुमच्या आयुष्यात घडलेच. या मागचा विनोद सोडून द्या. माझे अध्यात्मिक गुरु श्री नौशीर इंजिनीअर म्हणतात कि आपल्या आयुष्यातील ८० % हे विधिलिखित असते व २० % आपल्याला निवडण्याचे स्वातंत्र्य (Free Choice or Free Will) असते. सकारात्मक विचार असणारी माणसे या २० % निवड स्वातंत्र्याचा उपयोग इतक्या खुबीने करतात कि उरलेले ८० % आयुष्य ते यशस्वीरीत्या जगतात. इथे लक्षात घेणे महत्वाचे आहे कि त्यांच्या ८० % आयुष्यात जे घडणार होते तेच घडते पण ते निवड स्वातंत्र्याचा उपयोग यशस्वीपणे करतात व या सर्व प्रसंगातून योग्य मार्ग काढतात व त्या प्रसंगांचा आपला भौतिक व अध्यात्मिक विकास करण्याकरिता करतात. मग या २० % निवड स्वातंत्र्यात काय येते. सर्वात प्रथम कोणत्याही प्रसंगाला योग्य भावनिक प्रतिसाद (Emotional Response) द्या. कोणताही टोकाचा भावनिक प्रतिसाद प्रतिसाद देऊ नका. जसे अति आनंद अति दुख, अति राग इ. तोंडातून येणारा प्रत्येक शब्द सांभाळून वापरा. लोकसंग्रह वाढवा. ज्ञान वाढवा. कोणत्यातरी कलेमध्ये अथवा कामात असे कौशल्य प्राप्त करा कि त्यात तुमचा हात या क्षेत्रात कोणीही धरू शकणार नाही. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रातील सर्व तसेच आधुनिक ज्ञान मिळवा. लक्षात घ्या या गोष्टी तुम्ही निवडू शकता व यांचा उपयोग तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी करता येईल. व स्वतःचे ८० % भविष्य लिहिता येईल.

2 comments: